Tiranga Times Maharastra
नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 च्या निकालांमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 13 आणि 14 मध्ये काँग्रेसने जोरदार कामगिरी करत तब्बल तीन जागांवर विजय मिळवला आहे. या दोन्ही प्रभागांवर मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी कौल बदलत काँग्रेसच्या उमेदवारांवर विश्वास दाखवला. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान पार पडल्यानंतर 16 जानेवारी रोजी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली आणि निकाल जाहीर होताच राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. या निकालामुळे नाशिकमधील सत्तासमीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
